नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कंटेनमेंट झोन मध्ये येत्या ३० जून पर्यंत लॉक डाऊन वाढवण्याचा, आणि कंटेनमेंट झोनबाहेरच्या क्षेत्रांमध्ये टप्प्या टप्प्यानं प्रतिबंध काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. तसा आदेश केंद्रीय गृह मंत्रालयानं आज जारी केला.
त्यानुसार पहिल्या टप्प्यात ८ जूनपासून धार्मिक स्थळं, प्रार्थना स्थळं , उपहारगृह आणि इतर तत्सम सेवा, आणि शॉपिंग मॉल्स वगळताइतर ठिकाणी नियम पाळून पूर्वीप्रमाणे व्यवहार सुरु करता येतील. दुसऱ्या टप्प्यातशाळा, महाविद्यालय, शैक्षणिक आणि प्रशिक्षणसंस्था राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांशी परामर्श करून सुरु केली जातील.
तिसऱ्याटप्प्यात आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक, मेट्रो रेल्वे , चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, बार, एंटरटेनमेंट पार्क्स, सभागृह तसंच सामाजिक, राजकीय, क्रीडाविषयक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजन इत्यादी गोष्टींबाबत निर्णय घेतला जाईल.