नवी दिल्ली : अमेरिकेत एका खासगी कंपनीच्या अंतराळ यानातून नासाचे २ अंतराळवीर अवकाशात झेपावले. फ्लोरिडा इथल्या केनेडी स्पेस सेंटरमधून झेपावलेले हे यान आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात जाणार आहे. त्यासाठी त्याला १९ तासाचा वेळ लागणार आहे.
जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या खासगी कंपनीने तयार केलेले यान अवकाशात झेपावलं आहे. एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीने हे यान तयार केले आहे. Crew Dragon असं या अंतराळ यानाचं नाव आहे.
या यानासाठी लागणारं रॉकेट ही या कंपनीनेच तयार केलं आहे. फाल्कन ९ असं त्याचं नाव आहे. यापूर्वी केवळ अमेरिका, रशिया आणि चीन सरकारच्या अंतराळ संस्थांना मानवाला अवकाशात पाठवता आलं आहे. यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित होते.