मोबाईलचे क्रमांक ११ आकड्यांचे करण्याचा प्रस्ताव नाही TRAI नं स्पष्ट केलं
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोबाईलचे क्रमांक ११ आकड्यांचे करण्याचा आपला कुठलाही प्रस्ताव नसल्याचं TRAI नं अर्थात भारतीय दूरसंवाद नियामक प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे.
याबाबत माध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या माहितीचं TRAI नं खंडन केलं असून, देशातली लँड लाईन दूरध्वनी सेवा आणि मोबाईल सेवेचे क्रमांक देण्यासाठी पुरेशी यंत्रणा असायला हवी, असा आपला प्रस्ताव असल्याचं TRAI नं स्पष्ट केलं आहे.