परराज्यातल्या लोकांना त्यांच्या राज्यातील रेल्वेस्थानकांपर्यंत नेऊन सोडलं
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराज्यातल्या लोकांना त्यांच्या राज्यात सुखरूप पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं उपलब्ध करून दिलेल्या सुविधेअंतर्गत, काल पर्यंत ४१ हजार ८७४ बस फेऱ्यांच्या माध्यमातून, ५ लाख ८ हजार ८०३ स्थलांतरीतांना, त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत किंवा जवळच्या रेल्वेस्थानकांपर्यंत नेऊन सोडण्यात आलं आहे.
आतापर्यंत, मध्यप्रदेश, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक यासारख्या राज्यांच्या सीमेपर्यंत एस टी च्या बस धावल्या आहेत. यासाठी, शासनानं १०० टक्के निधी उपलब्ध करून दिला असून आतापर्यंत ९४ कोटी ६६ लाख रुपये खर्च झाले आहेत.