Site icon साप्ताहिक एकच ध्येय

एक देश एक शिधापत्रक प्रणालीअंतर्गत राज्यांनी धान्यवाटपाला सुरुवात करावी केंद्र सरकारचे राज्यांना आवाहन

नवी दिल्ली : एक देश एक शिधापत्रक प्रणालीअंतर्गत राज्यांनी आजपासून धान्यवाटपाला सुरुवात करावी  असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे. दरम्यान या प्रणाली अंतर्गत आता ओदिशा, सिक्कीम आणि मिझोरम या राज्यांचही समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा तसंच ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी आज नवी दिल्ली इथं ही माहिती दिली.

देशातल्या नागरिकांना अन्नसुरक्षा प्रदान करणाऱ्या ही प्रणाली आतापर्यंत महाराष्ट्राखेरीज आंध्रप्रदेश, बिहार, गोवा, गुजरात, हरयाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, केरळ,कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब, तेलंगण, त्रिपुरा आणि उत्तर प्रदेश या राज्यात तसंच दादरा- नगरहवेली आणि दीव – दमण या केंद्रशासित प्रदेशात लागू झाली असून उत्तराखंड, मणिपूर आणि नागालँड येत्या ऑगस्ट पर्यंत या प्रणालीत जोडले जातील. पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, मेघालय, दिल्ली, तमिळनाडू, छत्तीसगड या राज्यांमधे तसंच जम्मू कश्मीर,लडाख, पुदुचेरी, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात ती लागू करण्याचा केंद्रसरकारचा प्रयत्न सुरु आहे.

३१ मार्च २०२१ पर्यंत पूर्ण देशात ती लागू होईल. या प्रणालीमुळे शिधापत्रिकाधारकांना देशात कुठेही रास्त दर दुकानात शिधापत्रक आणि आधारकार्ड दाखवून अन्नधान्य मिळू शकेल.

Exit mobile version