Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोनाचा प्रभावामुळे अर्थव्यवस्थेमध्ये मंदी आली असली तरीही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून येत्या काळात भारताचा वेगानं विकास होईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रभावामुळे अर्थव्यवस्थेमध्ये जरी मंदी आली असेल तरी प्रतिभा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात भारताचा वेगाने विकास होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले.

सर्वसमावेशकता, गुंतवणूक, पायाभूत सुविधा आणि नवकल्पना यांच्या माध्यमातून देशाला स्वावलंबी बनवून देशाचा विकास होईल असंही त्यांनी सांगितलं. आयात कमी करून, उत्पादकता वाढवणं हे आत्मनिर्भर भारत अभियानाचं उद्दीष्ट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज भारतीय उद्योग महासंघ – सीआयआयच्या १२५ व्या वर्धापनदिनानिमित्त संघटनेच्या सदस्यांशी बोलत होते.

कोरोना विषाणू संक्रमणाला प्रतिबंध करणं आणि अर्थव्यवस्था बळकट करणं, या दोन बाबींना सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं. आपल्या सरकारनं केलेल्या आर्थिक सुधारणा सुनियोजित, सुसंबद्ध आणि भविष्यकाळाचा विचारातून केलेल्या असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

कृषी क्षेत्र आणि एमएसएमईमध्ये सुरू झालेल्या सुधारणा या ऐतिहासिक असून या धोरणात्मक सुधारणांचा अर्थव्यवस्थेवर दीर्घकाळ परिणाम होईल आणि यामुळे देशातील रोजगाराच्या संधी निर्माण होतील असं ही पंतप्रधानांनी यावेळी बोलतांना सांगितलं.

Exit mobile version