नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविध अनियमितेमुळं राज्यातल्या ८९८ रेशन दुकानांवर विविध कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत धान्य वाटप करतांना अनियमितता तसंच नियमभंग करणाऱ्या ४८३ स्वस्त धान्य दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.
३२२ स्वस्त धान्य दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. राज्यातील ९३ रास्त भाव दुकानदारांची १०० टक्के अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी ई-पॉस ला जून अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहितीही भुजबळ यांनी दिली.