भारतीय हॉकी संघाची कप्तान राणीची राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय महिला हॉकी संघाची कप्तान राणीच्या नावाची शिफारस राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. याशिवाय वंदना कटारिया, मोनिका आणि हरमनप्रीत सिंगच्या नावाची शिफारस अर्जुन पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.
भारताचे दिग्गज हॉकीपटू आर पी सिंग आणि तुषार खांडकर यांच्या नावाची शिफारस मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. तर प्रशिक्षक बी जे करिअप्पा आणि रोमेश पठानिया यांच्या नावाची शिफारस द्रोणाचार्य पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. हॉकी इंडियाने ही शिफारस केली आहे.