Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोना विषाणूबरोबर कसे जगायचे याबाबत पाच सूचना

नवी दिल्ली : सत्तर दिवसांच्या लॉकडाउन नंतर, अनलॉक 1.0 कार्यान्वित झाला आहे. अधिकृतपणे घोषित लॉकडाउन 5.0, 1 जून 2020 पासून सुरु असून , अर्थव्यवस्था आणि सामान्य जीवन नियंत्रित आणि टप्प्याटप्प्याने सामान्य स्थितीत परत येत आहे. ही एक नवीन सामान्य जीवनाची  सुरुवात आहे. ती अनेक दिवस चालणार आहे. ‘आपण विषाणूसह जगायला शिकले पाहिजे’, असे तज्ञ आणि अधिकारी सुचवत आहेत. लस यायला अजून काही महिन्यांचा अवकाश आहे, आपल्याला पुन्हा सामान्यपणे  जगण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्रा.के. विजय राघवन यांनी ‘विषाणूंसह जगण्याचे’ पाच सूचना दिल्या आहेत.

“एकतर आपण विषाणूला बदलायला पाहिजे, किंवा आपण स्वतःला बदलले पाहिजे;विषाणू बदलण्यास वेळ लागणार आहे”, असे  प्रा.विजय राघवन म्हणाले. औषधे आणि लसांचे संशोधन आणि विकास सुरु आहे, परंतु व्यापक वैद्यकीय चाचण्यांनंतर   व्यापक वापरासाठी या लसी उपलब्ध होण्यासाठी   वेळ लागणार आहे. प्रत्येकासाठी औषधे आणि लस तयार करणे देखील वेळखाऊ आहे. दरम्यान, महामारीचा सामना करण्यासाठी आपण स्वतःला बदलू शकतो.

प्रा.राघवन यांच्या पाच सूचना पुढीलप्रमाणे .

  1. जेव्हा आपण घराबाहेर पडता तेव्हा मास्क वापरा

अलिकडील अभ्यासात असे दिसून आले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती बोलते तेव्हा लाळेचे जवळपास  1000 लहान थेंब बाहेर पडतात. जर त्या व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असेल तर या प्रत्येक थेंबामध्ये हजारो कीटाणू असतील.  मोठे थेंब सामान्यत: एक मीटरच्या अंतरात जमिनीवर पडतात. मात्र ,  प्रामुख्याने जर जागा  हवेशीर नसेल तर लहान थेंब जास्त काळ हवेत तरंगू शकतो. बरेच लोक ज्यांना विषाणूचा संसर्ग आहे त्यांची लक्षणे दिसत नाहीत. म्हणूनच, त्यांना संसर्ग झाला आहे याची त्यांना जाणीवही असू शकत नाही. आपल्याला संसर्ग झाला असेल तर मास्क परिधान केल्यामुळे केवळ आपलेच नव्हे तर इतरांचेही संरक्षण होते. प्रा. राघवन म्हणतात, “आम्ही घरच्या घरी मास्क बनविण्याबाबत एक पुस्तिका तयार केली आहे, ज्याचा उपयोग आपला  चेहरा झाकण्यासाठी करता येईल,”

  1. जागरूकपणे हात स्वच्छ ठेवण्याची सवय ठेवा

डब्ल्यूएचओच्या नेतृत्त्वाखालील अभ्यासानुसार चीनमधील 75,465 कोविड -19 रुग्णांच्या विश्लेषणावरून असे दिसून आले आहे की कोरोना विषाणू  प्रामुख्याने लोकांमध्ये श्वसन थेंब आणि संपर्क मार्गाने  प्रसारित होतो.  जेव्हा संक्रमित लोकांशी एखाद्याचा थेट संपर्क येतो तेव्हा कोविड -19  विषाणूचा प्रसार होऊ शकतो. किंवा जेव्हा आपण त्याच्या आसपासच्या पृष्ठभागावर  किंवा संक्रमित व्यक्तीद्वारे वापरलेल्या वस्तू (उदा. दरवाजाचे हँडल आणि वॉशरूम टॅप) यांना स्पर्श करतो. आमचा सामान्य आग्रह म्हणजे आपल्या चेहेर्‍यापर्यंत पोहोचू न देणे. कमीतकमी तीस सेकंदापर्यंत आपण साबणाने आपले हात पूर्णपणे धुवून घेतल्यास, आपल्या हातातला विषाणू नष्ट होतो. “काही सूचना आहेत की विषाणू संसर्गजन्य आणि तोंडाद्वारे देखील पसरू शकतो. म्हणून हात पाय धुणे चांगले. ”असे प्रा. राघवन म्हणतात.

  1. सामाजिक अंतर राखणे

बहुधा, संसर्ग एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास किंवा त्याने  श्वासोच्छवासाद्वारे बाहेर टाकलेल्या थेंबाचा आपण केलेल्या श्वासोच्छवासातून होतो. सामान्य स्थितीत हे  थेंब संक्रमित व्यक्तीपासून सुमारे एक मीटर अंतरावर प्रवास करतात. बाजारपेठ, कार्यालये आणि सार्वजनिक वाहतुकीमध्ये एकमेकांपासून एक मीटर अंतर ठेवल्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल. “तरुणांना लक्षणे न आढळता संसर्ग होऊ शकतो आणि ते वृद्धांनाही बाधित  करतात. प्रामुख्याने वृद्धांसारख्या असुरक्षित आणि अनेक प्रकारे आजारी असलेल्या लोकांशी शारीरिक संबंध दूर ठेवण्यासाठी आपण विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, असे प्रा.राघवन म्हणले.

  1. चाचणी आणि पाठपुरावा

“जर एखादी व्यक्ती कोविड-19बाधित असल्याचे दिसून आले तर एखाद्याने त्याचवेळेस  परत जावे आणि त्या व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील लोकांचा शोध  घ्यावा आणि त्यांना ओळखले पाहिजे. आपण त्यांची तपासणी केली पाहिजे, असे प्रा. राघवन म्हणतात. केवळ एक संक्रमित व्यक्ती हा विषाणू इतरांपर्यंत पोहोचवू शकतो किंवा पृष्ठभाग दूषित करुन विषाणूचा प्रसार करू शकतो. जर बहुतेक संक्रमित व्यक्तींची ओळख पटली तर विषाणूच्या संप्रेषणावर नियंत्रण ठेवणे सोपे होते.

  1. अलगीकरण

प्रा. राघवन म्हणतात, “ज्या लोकांना बाधित रुग्ण म्हणून ओळखले गेले आहे त्यांना वेगळे केले पाहिजे.” एकदा अलग झाल्यावर संक्रमित व्यक्तीला  योग्य वैद्यकीय मदत मिळू शकते. पुढे,  वेगळे राहिल्यामुळे संक्रमित व्यक्ती इतरांना हा विषाणू पसरवू शकत नाही. संसर्गाची साखळी तोडली  जाऊ शकते.

“जर एखादी व्यक्ती उच्च  वेगाने हे करू शकली आणि इतर सर्वांनी त्याचे अनुकरण केले  तर आपण औषधे आणि लसीसाठी काही करण्याची वाट पाहत असताना आपले सामान्य जीवन जगू शकतो.  प्रा. राघवन म्हणाले की, जर आपण यापैकी काहीही केले नाही  आणि यापैकी कोणत्याही गोष्टीत  आपण चुकलो तर आपल्याला त्रास होईल.

पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतात परिस्थिती वेगळी आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मुंबईतील धारावीसारख्या दाट लोकवस्तीत अनेक लोक राहतात म्हणून शारीरिक अंतर राखणे कठीण झाले आहे. तसेच भारतात बहुतेक घरांमध्ये तीन पिढ्या एकत्र राहतात. “यामुळे शारीरिक अंतराची अंमलबजावणी करणे कठीण होऊ शकते. म्हणूनच या विशिष्ट समस्यांना सामोरे जाण्यासाठी आपल्याकडे काही नवीन उपाययोजना करण्याची गरज आहे, असे प्रा. के विजय राघवन म्हणतात.

“काय करावे हे ठरवण्याची बहुस्तरीय जबाबदारी आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संप्रेषण आणि त्या संप्रेषणाचा संदेश आपल्या सर्वांनी कृतीत आणणे ”प्रा.के. विजय राघवन म्हणाले.

केंद्र सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाने दाट लोकवस्ती असलेल्या क्षेत्रांमध्ये स्वच्छता आणि स्वच्छतेसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. चेहरा आणि तोंडासाठी घरगुती संरक्षणाचे कवच तयार करण्याबाबत पुस्तिका तयार केली आहे. http://psa.gov.in/information-related-covid-19 या संकेतस्थळावर अनेक भारतीय भाषांमध्ये हे विनामूल्य डाउनलोडसाठी उपलब्ध आहेत.

Exit mobile version