Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशात कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण जवळपास ४८%

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-१९ रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण ४७.९९% झालं आहे. गेल्या २४ तासात देशात ३ हजार ८०४ रुग्ण बरे झाले, आतापर्यंत १ लाख ४ हजार १०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. देशात कोरोना विषाणूची लागण झालेले ९ हजार ३०४ नवे रुग्ण आढळले तर २६० रुग्णांचा मृत्यू झाला.

एकूण रुग्णसंख्या २ लाख १६ हजार ९१९ झाली असून आतापर्यंत एकूण मृतांची संख्या ६ हजार ७५ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. राज्यात काल कोविड-१९ चे २ हजार ५६० नवे रुग्ण आढळले तर १२२ जणांचा मृत्यू झाला.

९९६ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ३२ हजार ३२९ तर एकंदर बाधितांची संख्या ७४ हजार ८६० झाली आहे. कोविड-१९ नं आतापर्यंत २ हजार ५८७ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात ३९ हजार ९३५ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

१ मे पासून राज्यातील रुग्ण वाढीचा वेग क्रमशः कमी होत आहे. १ जून रोजी तो देशाच्या सरासरी पेक्षा कमी, ४ पुर्णांक ७४ शतांश टक्के झाला. आज रुग्णवाढीचा हा दर आणखी कमी होत ३ पुर्णांक ४१ शतांश टक्के झाला आहे. राष्ट्रीय सरासरी पेक्षा तो १ टक्क्यानं कमी आहे. त्याचवेळी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढताना दिसत आहे. यावरुन राज्यातील कोविड-१९ प्रसाराचा वेग मंदावत असल्याचे स्पष्ट होत आहे.

रत्नागिरीत करोनाचे आणखी १२ रुग्ण सापडल्यानं जिल्ह्यातल्या करोनाबाधितांची संख्या ३१९, झाली तर आणखी ४ रुग्णांना उपचारांनंतर घरी सोडल्यानं बरे झालेल्या रुग्णांची संख्या १२४ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १८० जण संस्थात्मक विलगीकरणाखाली आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळी आणखी चार जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी ७ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण मुंबईला उपचारासाठी गेला आहे. त्यामुळे आता ८८ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गातल्या  रुग्णांची एकूण संख्या ९७ झाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या. दोन दिवसांत २५ रुग्ण वाढले असून एकूण संख्या १७७ इतकी झाली आहे तर आतापर्यंत एकूण ८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

मनमाडमध्ये  ५५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मनमाडचे १५ आणि नाशिक जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १३५३ वर पोहोचली आहे.एकट्या नाशिक शहरात २७४ बाधित रुग्ण आहेत.

अकोला शहरात कोव्हिड-१९  चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनानं संपुर्ण अकोला शहराचे  सर्वंकष सर्व्हेक्षण सुरू केले आहे. यासाठी ४२६ गट तयार केले असुन प्रतिबंधीत क्षेत्र वगळता संपुर्ण शहराचे सर्व्हेक्षण केलं जाणार आहे. या मोहिमेचा प्रारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात आज करण्यात आला.

परभणीत दोन व्यक्तीचे स्वॅब पॉझीटीव्ह आढळून आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांत परभणीतील मिलिंद नगर आणि पाथरी तालुक्यातील रामपूरीतील रुग्णांचा समावेश आहे.

सातारा जिल्हयात आणखी ७ जणांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून  हडपसर इथून साताऱ्यात  आल्यानंतर मृत झालेल्याचा कोरोना अहवाल पॉजिटिव आला आहे मात्र एन.सी.सी.एस. पुणे यांच्याकडून १२५, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड यांच्याकडून १३ जणांचे, क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा इथं तपासणी केलेल्या २३जणांचे त्याचबरोबर खासगी प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेल्या ७६ असे एकूण २३७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची  माहिती  जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यात अकरा संशयीत रुग्णांचे अहवाल कोरोना विषाणू अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये  नानशी येथील ८, केंधली येथील २ आणि वैद्य वडगाव येथील १ अशा अकरा रुग्णांचा समावेश आहे. जिल्यातल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आता १७० झाली आहे.

अमरावतीच्या रुक्मिणीनगर परिसरात ६५ वर्षीय व्यक्तीचा नागपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज पहाटे सहा वाजता मृत्यू झाला. सारी आजारामुळे त्यांना नागपूरला दाखल केलं होतं तिथं त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि गोरेगाव मेडिकल असोसिएशन  यांच्या माध्यमातून मुंबईत गोरेगावमध्ये २०० कोरोना सैनिकांचे पथक नागरिकांसाठी सुसज्ज झालं आहे. त्यामध्ये डॉक्टर, नर्सेस, पोलीस, महानगरपालिका कर्मचारी यांचा समावेश आहे.

‘टाळेबंदी हळू हळू सैल होत असताना लोकांच्या मनातील भीती घालवणे, हा प्रमुख उद्देश कोरोना सैनिकांच्या पथकाचं आहे.’अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

Exit mobile version