मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमला जाणार आहे. निवडणुकांमुळं होणाऱ्या गर्दीमुळं कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे.
हा संसर्ग रोखण्यासाठी यावर्षी जुलै ते डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य शासनाने राज्य निवडणूक आयोगाला केली होती. त्यानुसार या निवडणुका स्थगित केल्यांच निवडणुक आयोगानं कळविले आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांनाही त्या ज्या टप्प्यावर असतील त्याच टप्प्यावर पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे. ज्या ग्रामपंचायतींची ५ वर्षांची मुदत संपेल तिथे विद्यमान कार्यकारिणी पुढे तशीच चालू न ठेवता त्या ठिकाणी मुदत संपण्यापूर्वी योग्य प्रशासकाची नेमणूक करण्याची दक्षता घ्यावी, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे.
तसेच राज्य निवडणूक आयोग वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेऊन व आवश्यकतेनुसार राज्य शासनाशी सल्लामसलत करुन निवडणुकांवरील स्थगिती उठविण्याबाबत व निवडणुका घेण्याबाबत निर्णय घेईल, असेही आयोगाने कळविले आहे.
वादळामुळं सप्तश्रृंगीगडावर जाणाऱ्या रस्त्यातल्या घाटात दरड कोसळली होती. मात्र आता ही दरड आता काढण्यात आली असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. नाशिक जिल्ह्यात वादळामुळं १९१ हेक्टर क्षेत्रावरील पीकाचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महासूल विभागाने व्यक्त केला आहे.
तर जिल्ह्यात एकुण १२५२ घरांचे पत्रे उडाले आहेत. तर ७ झोपड्या वादळामुळे उडून गेल्या आहेत. त्याच प्रमाणे या वादळामुळे ५६ जनावरे दगावली आहेत. जिल्ह्यात दोनशेहून अधिक झाडे उन्मळून पडली आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे नाशिक आणि मालेगाव परीमंडळातील ६५० वीजेचे खांब कोसळले होते. त्यामुळे ९८ उपकेंद्र आणि १ हजार ७४ वीज वाहिन्यांचा वीज पुरवठा खंडीत झाला होता त्यातील बहुतांश सर्वच ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत झाला आहे, असे महावितरणने कळवले आहे.