नवी दिल्ली : रेशनकार्डला आधार जोडलेले नसणे हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना, अन्नधान्याचा पात्र कोटा न मिळण्यातले एक कारण ठरत आहे, असे वृत्त काही माध्यमांकडून आले होते. मात्र उपलब्ध नोंदी आणि राज्य सरकारांकडून प्राप्त माहितीनुसार या वृत्तांना पुष्टी मिळत नाही.
लक्ष्यित सार्वजनिक वितरण यंत्रणा सुरळीत ठेवणे, अद्ययात ठेवणे ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे.
केवळ आधार क्रमांक नसल्याच्या कारणावरून कुठलाही लाभार्थी/घर, पात्र लाभार्थ्यांच्या/घराच्या यादीतून वगळू नये, अशा सूचना सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 24/10/2017 च्या पत्राद्वारे विभागाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच बायोमेट्रीक/आधार पडताळणी यातील अडथळ्यांच्या कारणामुळे कुठलाही पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित ठेवू नये अशा सूचनाही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्या आहेत.
अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रावसाहेब दानवे यांनी लोकसभेत ही माहिती दिली.