Site icon साप्ताहिक एकच ध्येय

‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यातील विविध जिल्ह्यात जीवित व वित्त हानी झाल्याचे निदर्शनास आले आहे. हे चक्रीवादळ नैसर्गिक आपत्ती असून त्यामुळे झालेली नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हास्तरावर सविस्तर पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

या चक्रीवादळामुळे शेतीपिकाचे नुकसान झाले असल्यास अशा नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यात यावेत व ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानी प्रकरणी बाधित शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार विहित केलेल्या दरानुसार मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या मदतीचा सविस्तर प्रस्ताव कृषी आयुक्तांमार्फत शासनास पाठवण्यात यावा, असे आदेश देण्यात आल्याचे थोरात यांनी म्हटले आहे.

Exit mobile version