नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध आता शिथिल केले जात असून, आता पाळीव प्राण्यांनाही घराबाहेर फिरायला नेण्याची मुभा दिली असल्याचं राज्यशासनानं आज मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केलं.
पाळीव कुत्र्यांना फिरायला नेण्याची परवानगी मिळावी याकरता दाखल झालेल्या याचिकेवर आज मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दीपांकर दत्त यांच्यासमोर सुनावणी झाली त्यावेळी महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी ही माहिती दिली.