Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्य सरकारच्या निवृत्तीवेतन धारकांनी वैयक्तिक तपशील देण्याचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकारच्या निवृत्तीवेतन धारकांना जन्मतारीख, ई मेल आयडी, पॅन कार्ड हेडिटेल्स पाठविण्याचे आवाहन अधिदान व लेखा कार्यालयाने केले आहे. pao@mahakosh.in या इमेल आयडीवर ही माहिती पाठवता येईल. किंवा अधिदान आणि लेखा कार्यालय, लेखा कोष भवन, ए विंग, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई -५१ या पत्त्यावर पत्राद्वारेही ही माहिती पाठवता येईल.

निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे वेतन वेळेवर मिळावे यासाठी डिजिटल डेटा आणि  अभिलेखे यांची पडताळणी आणि  अद्ययावतचे काम करण्याच्या कामासाठी ही माहिती पाठवायचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. यापूर्वी ज्या निवृत्तीवेतनधारकांनी माहिती पाठविली असेल त्यांनी पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नसल्याचे अधिदान व लेखा अधिकारी यांनी कळविले आहे.

Exit mobile version