Site icon साप्ताहिक एकच ध्येय

‘शिवराज्याभिषेक दिना’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन

पुणे : ‘शिवराज्याभिषेक दिना’निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथील विधानभवनातील (कौन्सिल हॉल) छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या प्रतिमेला पुष्‍पहार घालून वंदन केले. यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार डॉ.अमोल कोल्‍हे, विभागीय आयुक्‍त डॉ.दीपक म्‍हैसेकर, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, आमदार अतुल बेनके, आमदार सुनील टिंगरे, उपायुक्‍त संजयसिंह चव्‍हाण आदींसह इतर लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. उपमुख्‍यमंत्री श्री पवार यांनी उपस्थितांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

Exit mobile version