कोळसा क्षेत्रात केंद्र सरकार ३ ते ४ वर्षात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या कोळसा उत्पादनात वाढ करून त्याचा उठाव आणि वाहतुकीसाठी केंद्र सरकार येत्या ३ ते ४ वर्षात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं आहे. ते आज नागपुरात वेस्टर्न कोल फील्ड कंपनीच्या भूमिगत खाणीच्या ऑनलाईन अनावरण कार्यक्रमात बोलत होते.
कोळशाची आयात कमी करण्याच्या उद्देशानं सरकार पावलं उचलत असल्याचं त्यांनी सांगितलं.
देशाच्या एकूण विजेपैकी ७५ ते ८० टक्के वीजनिर्मिती कोळशाच्या वापरानं होत असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांकडून मार्गदर्शक तत्व जरी झाल्यावर याबाबत अधिक तपशील जरी केले जातील असं जोशी यांनी सांगितलं.