Site icon साप्ताहिक एकच ध्येय

वाघांच्या संख्येबद्दल समाजमाध्यमांवर फिरत असलेली आकडेवारी अपुरी आणि दिशाभूल करणारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात वाघांच्या संख्येबद्दल समाजमाध्यमांवर फिरत असलेली आकडेवारी अपुरी आणि दिशाभूल करणारी असल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने म्हटलं आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रयत्नांमुळे वाघांची संख्या समाधानकारक रीत्या सुधारत असून 2006, 2010,2014   आणि 2019 मधे झालेल्या व्याघ्रगणनेमधे ते स्पष्ट दिसून येत असल्याचं सरकारी पत्रकात म्हटलं आहे.

दरवर्षी सरासरी 94 वाघांचा मृत्यू होत असला तरी  संख्या वाढीचा दर 6%  असल्याने एकूण संख्येत भर पडत आहे. वाघांच्या संख्येबद्दल पूर्ण पारदर्शकता असून ती आकडेवारी  सर्व नागरिकांच्या माहितीसाठी खुली असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे.

Exit mobile version