राज्यात खाजगी किंवा सरकारी रुग्णालयात बेडच्या उपलब्धतेबाबतची अडचण दूर होणार
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई महानगरपालिका प्रशासनानं १२८ रुग्णालयांची माहिती ऑनलाईन केली आहे, तर पुण्याच्या विभागीय आयुक्तांनीही डॅश बोर्ड स्थापन केला आहे. यामुळे खाजगी किंवा सरकारी रुग्णालयात बेडच्या उपलब्धतेबाबतची अडचण दूर होणार आहे.
मुंबईत एका क्लिकवर बेडची माहिती तसंच १९१६ या सेवेअंतर्गत बेड तर पुण्यात प्रशासकीय यंत्रणेबरोबरच सर्वसामान्य नागरिकांना डॅश बोर्ड सुविधेचा उपयोग होणार आहे. प्रशासनाकडून बेडची संख्या आवश्यकतेनुसार वाढवली जात असली तरी कोणत्या रुग्णालयात पुरेसे बेड उपलब्ध आहेत किंवा नाही याच माहिती नसल्याने सर्वसामान्य रुग्णांना रुग्णालयाच्या शोधात भटकावं लागत होत. मात्र यापुढे रुग्ण तसंच त्यांच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
बेड उपलब्ध असणाऱ्या नजीकच्या रुग्णालयात रुग्णाला जलदगतीने दाखल करणे यापुढे शक्य होईल.