मातृत्वाशी निगडीत समस्यांसाठी केंद्र सरकारनं स्थापन केलं कृती दल
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मातृत्वाचं वय, गरोदर महिलांच्या मृत्युदरावर नियंत्रण आणि पोषण मूल्यांमध्ये वाढ करायच्या हेतूनं सरकारनं कृती दलाची स्थापना केली आहे.
जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली हे दल स्थापन केलं असून येत्या ३१ जुलैपर्यंत त्या आपला अहवाल सादर करणार आहेत. महिला आणि बालविकास मंत्रालयानं स्थापन केलेलं
हे कृती दल सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यात सुधारणा सुचवणार असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तपशिलवार कार्यक्रम हाती घेणार आहे.
महिलांमध्ये उच्च शिक्षणाला उत्तेजन देण्यासाठीही हे दल नवीन उपाय आखणार आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिलांसाठी कृती दल स्थापन करण्याची घोषणा केली होती.