नवी दिल्ली : NCHM म्हणजेच नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अर्थात राष्ट्रीय हॉटेल व्यवस्थापन परिषदेची, या वर्षाची संयुक्त प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
सध्याच्या कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांकडून आलेल्या विनंतीच्या अनुषंगाऩ हा निर्णय घेतल्याचं, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल नि:शंक यांनी ट्विटरवरून जाहीर केलं आहे. परीक्षेचं सुधारीत वेळापत्रक योग्य वेळी जाहीर केलं जाईल, असही त्यांनी म्हटलं आहे.