भारत – चीन तणावावर चर्चेनं तोडगा काढण्यावर दोन्ही देशांमधे सहमती
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत – चीन सीमेवरच्या परिस्थितीबाबत यापूर्वी झालेल्या उभयपक्षी करारांच्या अधीन राहूनच शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यावर दोन्ही देशांमधे सहमती झाली आहे.
दोन्ही देशांच्या प्रमुख लष्करी अधिकाऱ्यांदरम्यान ची चर्चा काल लेह इथं सकारात्मक आणि सौहार्दपूर्ण वातावरणात झाली असं परराष्ट्रव्यवहार मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. दोन्ही देशांमधे स्थैर्य आणि विकासाच्या दृष्टीनं सीमेवर शांतता नांदण्याची गरज असल्याबद्दल उभयपक्षी सहमती नोंदली गेली. भारत – चीन राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्याला यंदा 70 वर्षं पूर्ण होत आहेत.
सचिव पातळीवरच्या चर्चेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव नवीन श्रीवास्तव आणि चीनच्या परराष्ट्र विभागाचे महासंचालक वु जियांगहो सहभागी झाले होते.