Site icon साप्ताहिक एकच ध्येय

घरांच्या किमती कमी करून विक्री करण्याच्या सूचनांना क्रेडाईचा विरोध

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं बांधकाम व्यवसायिकांना घराच्या किमती कमी करण्याच्या सूचना करण्याऐवजी या व्यवसायाला पुन्हा तेजी येण्यासाठी विविध प्रकारच्या सवलती द्याव्यात, अशी मागणी क्रेडाई या बांधकाम व्यवसायिकांच्या संघटनेनं केली आहे.

केंद्रानं देशभरातील बांधकाम व्यवसायिकांना घरांच्या किमती कमी करून त्यांची विक्री करण्याची सूचना केंद्रानं केली आहे. या सूचनेला क्रेडाईने विरोध दर्शवला असून त्याबद्दलचं एक पत्र केंद्र सरकारला पाठवलं असल्याचं क्रेडाईचे उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी सांगितलं.

Exit mobile version