वाहनांशी निगडीत सर्व कागदपत्रांची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाहन धारकांना आणि निगडीत क्षेत्रात काम करणाऱ्यांना दिलासा देणारी घोषणा आज केंद्र सरकारने केली. लॉकडाऊनच्या काळात मुदत संपलेली किंवा मुदत संपणारी वाहनांशी निगडीत सर्व कागदपत्रांची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामध्ये गाडी चालवण्याचा परवाना, गाडीचे नोंदणी प्रमाणपत्र, विविध प्रकारचे परमिट, फिटनेस प्रमाणपत्र आणि इतर संबंधित प्रमाणपत्रांचा समावेश आहे.