नीरव मोदी यांची संपत्ती जप्त करायला विशेष न्यायालयाची मंजूरी
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंजाब नॅशनल बँक आर्थिक गैरव्यवहारातला आरोपी नीरव मोदी याची संपत्ती जप्त करायला मुंबईतल्या विशेष न्यायालयानं मंजूरी दिली आहे. सक्तवसुली संचालनालयानं नीरव मोदीच्या सुमारे १४ हजार कोटी रुपयांच्या संपत्तीची यादी तयार केली आहे, यामध्ये काही महागडी चित्रं, चारचाकी वाहनं, आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. यामध्ये पंजाब नॅशनल बँकेसह इतर पक्षकारांकडे तारण म्हणून ठेवलेल्या संपत्तीचा समावेश केलेला नाही.
या संस्थांना वसुलीसाठी स्वतंत्र दावा करता येणार आहे. ही संपत्ती जप्त करण्याला आक्षेप घेणारी, नीरव मोदी याची याचिका न्यायालयानं फेटाळून लावली आहे. ही संपत्ती आता कायद्यानुसार केंद्र सरकारच्या अधीन असेल, असं न्यायालयानं म्हटलं आहे.