निरंक असलेले जीएसटी परतावे SMS द्वारेही भरता येणार
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा कर परतावा निरंक असलेल्यांना अर्ज SMS द्वारे पाठवण्याची सोय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेचा लाभ देशातल्या 22 कोटीहून जास्त करदात्यांना होणार आहे.
आतापर्यंत GSTR-3B अर्ज ऑनलाईन भरता येत होते. आता केवळ SMS द्वारे हे काम होऊ शकेल. याबाबतचा तपशील GSTN पोर्टलवर उपलब्ध आहे.