Site icon साप्ताहिक एकच ध्येय

बँक आणि ऊर्जा क्षेत्रावरील दबावाने शेअर बाजारात घसरण

मुंबई : बाजारात तेजी आणि मंदीच्या दिवसभरातील जोरदार रस्सीखेचीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मंगळवारी जवळपास १.२० टक्क्यांची घसरण दिसून आली. युरोपियन मार्केटमध्ये कमकुवत झाल्यानंतरही फार्मा आणि हेल्थकेअर स्टॉक्सनी बाजाराला काही प्रमाणात दिलासा दिला. याउलट वित्त आणि ऊर्जा क्षेत्राने बाजारावर दबाव आणल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले.

निफ्टी फार्मा आणि बीएसई हेल्थकेअर या दोन्ही जोड्यांनी १ टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावला. त्यामुळे सर्व चांगल्या बातल्या फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्रातूनच आल्या. निफ्टी फार्माने सर्व १० पैकी १० स्टॉक्समध्ये दिवस संपताना नफा कमावला. तर दुसरीकडे बीएसई हेल्थकेअरने एकूण स्टॉक्सपैकी ३८ मध्ये नफा कमावला तर ३४ स्टॉक्सनी घट दर्शवली. एसएमएस फार्माने २० टक्के बढतीसह बीएसईचे नेतृत्व केले. त्यानंतर शिल्पा मेडिकेअरने १४.१४ टक्के आणि किलिच ड्रगने ९.७८ टक्क्यांची वृद्धी नोंदवली. मोरपेन लॅब्स, व्हिव्हिमड लॅब्स आणि हिकल हे अनुक्रमे ५.५७%, ५.५३%, ५.०९% घसरणीसह बीएसईवर टॉप लूझर्स ठरले.

तेल, वायू आणि ऊर्जा क्षेत्र मंगळवारी घसरण दिसून आली. मूडीजने नुकतेच पतमानांकनात घट दर्शवल्याने तेल, वायू क्षेत्रावर विशेषत: भारतातील ‘सिक्स फॉलन एंजल्स’ वर मोठा परिणाम झाला. हे सर्व राज्य संचलित उद्योग असून त्यांचे सर्व बाँड २०२१ पर्यंत बांधिल आहेत. यात इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, ऑइल इंडिया, हिंदुस्तान पेट्रोलिअम, भारत पेट्रोलिअम, पेट्रोनेट एलएनजी आणि ओएनजीसी यांचा समावेश होतो.

१० शेअर्सवाल्या निफ्टी एनर्जीमध्ये फक्त अदानी ट्रान्समिशन आणि टाटा पॉवर हे अनुक्रमे ४.८७ टक्के आणि ०.२३ टक्के लाभासह सकारात्मक स्थितीत राहिले. गेल आणि बीपीसीएल हे ३.४८ टक्के आणि ३.२ टक्के नुकसानीसह सर्वात मोठे लूझर्स ठरले. एस अँड पी बीएसई ऑइल आणि गॅस इंडेक्सनेदेखील १.९६ टक्क्यांची घट दर्शवली. फक्त जीएसपीएल, कॅस्ट्रॉल इंडिया आणि पेट्रोनेट एलएनजी हे हिरव्या रंगात दिसून आले.

निफ्टी बँक आज काहीशा नफ्यात सुरू होऊन २१, २९५.५० अंकांवर बंद झाली. याआधी ती २१,१८७.३५ अंकांवर स्थिरावली होती. या क्षेत्रात दिवसाच्या सुरुवातीला सकारात्मक स्थिती दिसली. इंट्रा डेच्या तासांत २१, ५९० अंकांनी निर्देशांक वरील बाजूस होता. तथापि, आजच्या दिवसातील उच्चाकी स्थितीवरून तो १,००० पेक्षा जास्त अंकांनी घसरून २०,५८५.५ अकांवर विसावला. एकूणच, या इंडेक्सने ४ निर्देशांकात (आरबीएल बँक, इंडसइंड बँक, फेडरल बँक आणि बँक ऑफ बडोदा) नफा अनुभवला तर ८ निर्देशांक खाली आले.

Exit mobile version