भारतीय अर्थव्यवस्था पुढच्या वर्षात पुन्हा आर्थिक वाढीचा दर गाठेल असा फिचचा अंदाज
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आर्थिक वर्षात मंदीच्या गर्तेत सापडलेली भारतीय अर्थव्यवस्था पुढच्या आर्थिक वर्षात पुन्हा जोमाने उभारी घेऊन GDP वाढीचा साडेनऊ टक्के दर गाठेल असा अंदाज फिच मानांकन संस्थेनं व्यक्त केला आहे.
चालू आर्थिक वर्षात हा दर ५ टक्क्यांनी कमी होईल असाही त्यांचा अंदाज आहे. भारत आपल्या बरोबरीच्या इतर देशांपेक्षा पुढच्या वर्षी अधिक वेगाने प्रगती करेल असा अंदाज फिचच्या अहवालात आहे.
अर्थव्यवस्थेत तरलता वाढवण्याच्या दृष्टीने रिझर्व बँकेनं व्याजदर कमी करण्यासह विविध उपाययोजना केल्या असून सरकारनंही पाठबळ पुरवलं आहे.