उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी केंद्र सरकारने सचिवांचा एक सक्षम गट केला स्थापन
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महत्वाच्या उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी केंद्र सरकारने कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली काही सचिवांचा एक सक्षम गट स्थापन केला आहे. भावी गुंतवणूकदारांचा शोध घेऊन महत्वाच्या उद्योगक्षेत्रात गुंतवणूक घडवून आणण्यासाठी हा गट काम करेल.
गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी प्रोत्साहनपर योजना राबविण्याचे अधिकारही या गटाकडे असतील. या गटात नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसंच उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, वाणिज्य, महसूल व आर्थिक व्यवहार विभागाच्या सचिवांचा समावेश आहे.