भारतीय वंशाचे अमेरिकी मृदा शास्त्रज्ञ रतन लाल यांना यंदाचा ‘जागतिक खाद्य पुरस्कार’ जाहीर
Ekach Dheya
नवी दिल्ली : भारतीय वंशाचे अमेरिकी मृदा शास्त्रज्ञ रतन लाल यांना यंदाचा ‘जागतिक खाद्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे. मृदा केंद्रित कृषिविकासाद्वारे अन्नधान्न्याचं उत्पादन वाढवण्यासाठी केलेल्या कार्याबद्द्ल हा पुरस्कार दिला जाणार आहे. लाल यांच्या संशोधनामुळे नैसर्गिक स्रोतांचं संरक्षण आणि वातावरणातले बदल सौम्य करण्यासाठी मदत होणार आहे.
गेली पाच दशकं चालू असलेल्या लाल यांच्या कार्यामुळे जगभरातल्या ५० कोटीहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. त्यांच्या या प्रदीर्घ कारकिर्दीचा अडीच लाख डॉलर्सच्या या पुरस्काराने गौरव होणार आहे. लाल हे ओहियो विद्यापीठात मृदा विज्ञानाचे प्राध्यापक आणि कार्बन व्यवस्थापनासंबंधित केंद्राचे संस्थापक संचालक आहेत.