Site icon साप्ताहिक एकच ध्येय

चीनच्या सीमेवर परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात असल्याचं लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली : चीनच्या सीमेवर परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी दिली आहे. चीनशी सुरू असलेल्या चर्चेद्वारे दोन्ही देशांमधील मतभेद दूर होतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. ते आज डेहराडून इथं लष्कर अकादमीमधे नव्या अधिकाऱ्यांच्या संचलन समारंभात बोलत होते.

देश सध्या कठीण परिस्थीतून जात असताना देशाची सुरक्षा आणि सन्मान लष्काराचं प्रतिनिधित्त्व करणाऱ्या युवा अधिकाऱ्यांच्या क्षमतेवर अवलंबून असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.

भविष्यातल्या आव्हानांचा समाना करण्यासाठी या अधिकाऱ्यांना लष्करी उच्च दर्जाच्या कठीण प्रशिक्षणाचा निश्चितत उपयोग होईल, असा विश्वास जनरल नरवणे यांनी यावेळी व्यक्त केला.

Exit mobile version