महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांसाठी आता सर्वात कमी दर
Ekach Dheya
खासगी प्रयोगशाळेतील कोरोना चाचण्यांसाठी २२०० रुपये दर निश्चित – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची घोषणा
मुंबई : राज्यातील खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी आता जास्तीत जास्त २२०० रुपये इतका दर आकारला जाणार असून रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी २८०० रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे. सर्वसामान्य रुग्णांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे जाहीर केले.
यासंदर्भात आरोग्य विभागाने चार सदस्यांची समिती गठीत करण्यात आली होती. समितीने शासनाला अहवाला सादर केला असून त्यांच्या शिफारशीनुसार दरनिश्चित करण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.