उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केली महाराष्ट्र कामगार ब्युरो ची घोषणा
Ekach Dheya
मुंबई : लातूर जिल्हयात उद्योग, व्यापार, व्यवसायाला चालना देण्यासाठी, उद्योग उभारणीसोबतच, औद्योगिक वसाहतीत मेडीकल इक्वीपमेंट हब म्हणजेच वैद्यकीय साहित्य सामुग्री निर्मिती केंद्र उभारणार असल्याची माहिती, पालक मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
लातूर इथं, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने, जिल्ह्यातल्या ३० भूमिपुत्रांना, जिल्हयातल्या उद्योगांमध्ये प्रायोगिक तत्वावर रोजगार नियुक्ती पत्राचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमात ते आज बोलत होते.
उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्र कामगार ब्युरो ही नवीन घोषणा केली आहे, त्या अनुषंगानं, औद्योगीक वसाहतीत नावीन्यपुर्ण उद्योग उभारणीसाठी उद्योजकांनी पुढे यावं, त्यांना सर्व सहाय्य केलं जाईल असं आश्वासन, अमीत देशमुख यांनी यावेळी दिलं.