प्रशिक्षणासाठी जलतरण तलाव खुले न झाल्यास आपल्याला निवृत्तीचा विचार करावा लागेल-विरधवल खाडे
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रशिक्षणासाठी जलतरण तलाव खुले न झाल्यास आपल्याला निवृत्तीचा विचार करावा लागेल असं आशियाई स्पर्धेचा कांस्यपदक विजेता जलतरणपटू विरधवल खाडे याने म्हटलं आहे. योग्य सरावापासून वंचित राहावं लागलं तर आगामी टोकियो ऑलीम्पिकमध्ये भारतीय स्पर्धक पिछाडीवर पडू शकतात असं त्याने सांगितलं.
देशात जलतरणालाही इतर खेळांप्रमाणेच वागणूक मिळावी अशी अपेक्षा विरधवलनं व्यक्त केली. एस.एफ.आय अर्थात भारतीय जलतरण महासंघानंही क्रीडा मंत्रालयाला याबाबत विनंती केल्याचं त्याने सांगितलं.