नवी दिल्ली : महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार सुभाष झांबड यांची मुदत 29 ऑगस्ट 2019 ला संपत आहे. यामुळे रिक्त होणाऱ्या जागेसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
निवडणुकीची अधिसूचना 25 जुलै 2019 रोजी जारी होईल. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 1 ऑगस्ट 2019 असून अर्जांची छाननी दुसऱ्या दिवशी 2 ऑगस्टला होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 5 ऑगस्ट 2019 आहे. निवडणुकीसाठी मतदान 19 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 8.00 ते दुपारी 4.00 या वेळेत होईल. मतमोजणी 22 ऑगस्ट 2019 रोजी होईल. संबंधित मतदार संघात निवडणूक आचारसंहिता तात्काळ लागू होईल.