पुणे विभागातील 10 हजार 455 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
Ekach Dheya
विभागात कोरोना बाधित 16 हजार 469 रुग्ण – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : पुणे विभागातील 10 हजार 455 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 16 हजार 469 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 5 हजार 269आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 745 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 264 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 63.48 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.52 टक्के आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 12 हजार 919 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 8 हजार 125 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 259 आहे. कोरोनाबाधित एकूण 535 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 264 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.89 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 4.14 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 576 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 530, सातारा जिल्ह्यात 21, सोलापूर जिल्ह्यात 24, कोल्हापूर जिल्ह्यात 1 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील 766 कोरोना बाधीत रुग्ण असून 560 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 171 संख्या आहे. कोरोनाबाधित एकूण 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 1 हजार 811 कोरोना बाधीत रुग्ण असून 996 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 655 आहे. कोरोना बाधित एकूण 160 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 247 रुग्ण असून 130 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 110 संख्या आहे. कोरोना बाधित एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत 726 रुग्ण असून 644 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 74 आहे. कोरोना बाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 24 हजार 612 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 20 हजार 314 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 297 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 3 हजार 585 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 16 हजार 469 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
( टिप :- दि. 17 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )