Site icon साप्ताहिक एकच ध्येय

रिचर्डसन क्रूडास कोविड केअर सेंटरची वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडून पाहणी

मुंबई : मुंबईतील भायखळा येथील रिचर्डसन क्रूडास कंपनीच्या आवारात उभारण्यात येत असलेल्या कोविड  केअर सेंटरला वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज भेट देऊन पाहणी केली.

बृहन्मुंबई  महानगरपालिकेमार्फत उभारण्यात येत असलेल्या या कोविड केअर सेंटरमध्ये एक हजार रुग्णांच्या उपचाराची सोय करण्यात आली आहे. या कोविड  सेंटरचे दोन भाग  करण्यात आले असून पहिल्या सेंटरमध्ये डेडिकेटेड हेल्थ सेंटरमध्ये 300 रुग्णांसाठी ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आयसीयूची गरज नसणारे रुग्ण येथे उपचार घेऊ शकतात.

दुसऱ्या सेंटरमध्ये कोणतीही लक्षणे नसणाऱ्या सातशे रुग्णांच्या उपचाराची सोय करण्यात आलेली आहे. हे केअर सेंटर लवकरच कार्यरत करण्यात येणार आहे.  यावेळी आमदार अमीन पटेल, जे.जे. समूह रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर उपस्थित होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेंद्र गुजर यांनी या केअर सेंटरमधील सुविधा आणि कार्यपद्धतीची माहिती दिली.

Exit mobile version