मुंबई : उद्योग संचालनालयामार्फत सन 2017-18 या वर्षासाठी राज्यातील उत्कृष्ट निर्यातदार राज्यस्तरीय पुरस्कार योजना राबविण्यात येत आहे. या पुरस्कारासाठी सन 2017-18 या वर्षात ज्या सूक्ष्म,लघु, मध्यम व मोठ्या उद्योगांची तसेच एक्सपोर्ट हाऊस, मर्चंट हाऊस,महामंडळे, विभागीय कार्यालये, ज्यांनी निर्यातीत अग्रगण्य कामगिरी केलेली आहे, असे निर्यातदार भाग घेऊ शकतात. इच्छुकांनी दि. 30 सप्टेंबर 2019 पर्यंत उद्योग संचालनालयात अर्ज दाखल करावेत, असे उद्योग विकास आयुक्त यांनी कळविले आहे.
या पुरस्कारासाठी, राज्यात कार्यरत असलेले सूक्ष्म, लघु, मध्यम व मोठ्या उद्योगांची तसेच एक्सपोर्ट हाऊस, मर्चंट हाऊस, ज्यांची निर्यात सन 2017-18 मध्ये रु. 2.00 कोटीपेक्षा अधिक आहे आणि ज्यांनी उपक्रम आवेदन पत्र दाखल केलेल आहेत. तसेच ज्यांनी निर्यातीची सनदी लेखापाल यांची मागील 3 वर्षाची प्रमाणपत्रे सादर केलेली आहेत, असे उद्योग पात्र असतील.
सन 2017-18 या वर्षाकरिता निरनिराळ्या प्रवर्गामध्ये पुरस्कार देण्यात येणार आहेत. यात सूक्ष्म व लघु उद्योगासाठी 14, मोठे उद्योग-11,मर्चंट निर्यातगृह-01, मान्यताप्राप्त निर्यातगृह-01, ट्रेड हाऊस-01, लघु उद्योगांकरिता विभागीय पुरस्कार -06,राज्यस्तरीय महामंडळे-01, सेवा निर्यातदार-01 असे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
या योजनेची माहिती, अर्जाचा नमुना व पात्रतेच्या अटी www. maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. तसेच वरील अर्जाचा नमुना व माहिती जिल्हा उद्योग केंद्र कार्यालय व विभागीय कार्यालयातही उपलब्ध आहे.
कार्यालयाचा पत्ता विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, 2 रा मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई-32 असा असून, अधिक माहितीसाठी सदाशिव सुरवसे, उद्योग सह संचालक (निर्यात प्रचालन शाखा) यांच्याशी संपर्क साधावा. संपर्क दूरध्वनी क्र. 022-2202900, फॅक्स क्र. 022-22026826 व ई-मेल पत्ता: diexport@maharashtra.gov.in, jtdir१.industry@maharashtra.gov.in