स्वस्त दरातील फेस मास्क, हँड सॅनिटायझर्स आणि हँड रब्जचा समावेश
मुंबई : कोव्हिड-१९ वर मात करण्याच्या मोहिमेवर असलेल्या बायोसप (Biosup) हेल्थकेअर या औषधनिर्माता आणि सर्जिकल उत्पादनांतील संस्थापक कंपनीने तिच्या पोर्टफोलिओमध्ये फेस मास्क, हँड सॅनिटायझर आणि हँड रब्स ही तीन नवी उत्पादने समाविष्ट केली आहे. २०१८ मध्ये स्थापन झालेली बायोसप ही कंपनी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार, योग्य दर्जाच्या कच्च्या मालापासून भारतात उत्पादने तयार करते. बायसपचे कोव्हिड अत्यावश्यक श्रेणीतील सुरक्षेसाठीची उत्पादने संपू्र्ण भारतभरातील दुकानांसह कंपनीचे संकेतस्थळ आणि पेटीएम, फ्लिपकार्ट, अॅमेझॉन यांसारख्या विविध ऑनलाईन मंचावर उपलब्ध आहेत.
कंपनीच्या नुकत्याच लाँच केलेल्या उत्पादनांपैकी बायोहँड सॅनिटायझर्स हे १०० टक्के अँटीसेप्टिक असून पाण्याविना ९९.९९% जंतू नष्ट करण्याची क्षमता त्यात आहे. हे ५० मिली, १०० मिली, ५०० मिली आणि ५ लिटर या प्रमाणात अनुक्रमे २५ रु, ५० रु., १०० रु,, २५० रु., २५०० रुपयांना उपलब्ध आहे. फेसमास्कमध्ये थ्री प्लाय डिस्पोजेबल फेस मास्क, मेल्ट ब्लोन फेस मास्क, कॉटन वॉशेबल फेसमास्क असे पर्याय उपलब्ध आहेत. ही उत्पादने नोजपिनसह किंवा त्याविना मिळतात. तसेच ५,१० आणि ५० च्या समुहासह स्वच्छ अनुकुल पॅकेजिंगमध्ये ६ रुपयांपासून सुरू होणाऱ्या विविध किंमतीत मिळतात.
बायोहँड्स रब रब इन हँड हे जंतुनाशक एक ब्रॉड स्पेक्ट्रम अँटी मायक्रोबियल उत्पादन आहे. अँटीसेप्टीक हँडरबमध्ये अँटीमायक्रोबियल एजंट असून ते लावल्यास हातावरील बॅक्टेरिया नष्ट होतात. हे उत्पादन मुलांसाठी योग्य असून ते हाताना मुलायम आणि स्वच्छ ठेवते. कार्यालय किंवा घरात दीर्घकालीन वापरासाठीही हे सर्वात चांगले आहे. हे दोन आकारात उपलबद्ध आहे. ५०० मिलि आणि ५ लिटरचे उत्पादन अनुक्रमे २५० रुपये आणि २५०० रुपयांना उपलब्ध आहे.
बायोसप हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक श्री हिंमांशू बिंदल म्हणाले, “कोव्हिड-१९ विरुद्धची ही आपली लढाई दीर्घकाळ सुरू राहणार असून आपल्या लोकांचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बायोसपमध्ये व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय तसेच इतरांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याकरिता प्रत्येक प्रतिबंधात्मक उपाययोजना आखून त्यांची काळजी घेणे हे आमचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. सध्याच्या समस्येवर सर्वोत्कृष्ट उपाय देण्याचा तसेच आमच्या ग्राहकांचे आरोग्य लक्षात घेऊन सर्व उत्पादने निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”