उपसरपंचांना १ ते २ हजार रुपये मानधन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांबरोबरच आता उपसरपंचांनाही दरमहा मानधन देण्यात आलं आहे. लोकसंख्येनुसार १ ते २ हजार रुपये मानधन उपसरपंचांना दिलं आहे.
राज्यात सुमारे २८ हजार ग्रामपंचायती असून त्यातील ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केलेल्या २४ हजार ४८५ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांच्या खात्यावर सध्या मानधन जमा झाले आहे.
उर्वरित उपसरपंचांच्या खात्यावर मानधन जमा करण्याची कार्यवाही सुरु असून ती लवकरच पूर्ण केली जाईल, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.
पहिल्या टप्प्यात १५ कोटी ७२ लाख रुपयांची रक्कम उपसरपंचांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आली आहे. याशिवाय नोव्हेंबर २०१९ पासून प्रलंबित राहिलेल्या राज्यातल्या सरपंचांच्या मानधनापोटी नुकतेच २२ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.