Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जिजाऊ माँ साहेब म्हणजे नेतृत्व, कर्तृत्व, मातृत्वाची मूर्ती!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

मुंबई : राजमाता जिजाऊ माँ साहेब यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते साकारण्याची कर्तबगारी दाखविली. त्या नेतृत्व, कर्तृत्व आणि मातृत्वाच्या मूर्ती होत्या, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना स्मृतिदिनी अभिवादन केले आहे.

अभिवादन करताना मुख्यमंत्री म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य आणि लोककल्याणकारी राज्य स्थापनेची प्रेरणा राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्याकडून मिळाली. त्या मातृत्वाची मूर्ती होत्या पण तितक्याच करारी कर्तृत्ववान होत्या. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांना शौर्य, धैर्य आणि नेतृत्व गुणांचे धडे दिले. यामुळेच परकियांच्या जुलमी राजवटी उलथून गेल्या. रयतेतील प्रत्येक घटकाची काळजी घेण्याची शिकवण त्यांनी दिली. स्वराज्यात धर्मा इतकाच त्यांचा स्री रक्षण-सक्षमीकरणाबाबत कटाक्ष होता. त्यांच्या नजरेतील स्वराज्य व सुराज्य आणण्यासाठी प्रयत्नशील राहूया, हेच विश्ववंद्य जिजाऊ माँ साहेब यांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि त्यांना मानाचा मुजरा.

Exit mobile version