राज्यातल्या उद्योगांना कामगारांची कमतरता भासणार नाही, उद्धव ठाकरे
Ekach Dheya
नवी दिल्ली : स्थालांतरित मजूर राज्यातून निघून गेले असले तरी राज्यातल्या उद्योगांना आवश्यक असलेल्या कुशल आणि अकुशल कामगारांची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
ते काल ‘सीआयआय’च्या वतीने आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्समधे राज्यातल्या प्रमुख उद्योजकांशी बोलत होते. स्थलांतरित मजुरांच्या जाण्यामुळे रिक्त झालेल्या औद्योगिक क्षेत्रातल्या जागांवर स्थानिकांना प्राधान्य द्यावं, असं आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी उपस्थित उद्योजकांना केलं.
कामगारांची समस्या सोडविण्यासाठी राज्यात आता औद्योगिक कामगार ब्युरो सुरू केला जाणार आहे. यामुळे नोकरी शोधणारे आणि नोकरी मागणारे यांच्यामधील दरी दूर होणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
उद्योगांसाठी राज्यात सुमारे चाळीस हजार हेक्टर जमीन राखीव ठेवलेली आहे. विविध परवान्यांऐवजी आता ४८ तासांत महापरवाना दिला जाणार आहे. यामुळे राज्यात नव्या प्रकल्पांना सुरु होण्यास कमी कालावधी लागणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.