Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे टोलवसुली अधिकारापोटी ‘आयआरबी’कडून ‘एमएसआरडीसी’ला ६ हजार ५०० कोटींचा पहिला हप्ता प्रदान

मुंबई : ‘यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गा’वरील पथकरवसुली अधिकारापोटी देय रकमेपैकी 6 हजार 500 कोटी रुपयांचा पहिला हप्ता ‘आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीकडून आज राज्य सरकारला प्रदान करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमएसआरडीसी आणि राज्य सरकारच्यावतीने मंत्रालयात याचा औपचारिक स्वीकार केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे), नगरविकास तथा सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव अजोय मेहता, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर, स्टेट बँक आणि युनियन बँकेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

‘यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गा’ वरील पथकर वसुलीसाठी ‘आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनी आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांच्यात 8 हजार 262 कोटी रुपयांचा करार झाला असून पहिल्या वर्षी आयआरबीकडून सरकारला 6 हजार 500 कोटी, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी प्रत्येकी 850 कोटी, तसेच चौथ्या वर्षी 62 कोटी मिळणार आहेत.

Exit mobile version