Site icon साप्ताहिक एकच ध्येय

झेस्टाने वॉलमाउंट ऑटोमॅटिक थर्मोमीटर केले सादर

मुंबई : झेस्टाने आरोग्यसेवा क्षेत्रातील स्टाँच या अग्रगण्य कंपनीसोबत भारतातील पहिल्या ईएस-टी०३ वॉलमाउंट ऑटोमॅटिक थर्मोमीटरचे लाँचिंग केले. अत्याधुनिक इन्फ्रारेट चिप वापरून थर्मोमीटर त्याच्याजवळ सुमारे १५ सेंटीमीटरच्या परिसरात आलेल्या कोणत्याही व्यक्तीचे तापमान मोजू शकते. अशा प्रकारे संभाव्य वाहकांमधील आजाराच्या लक्षणांचे मूल्यांकन करण्यासाठी मानवी हस्तक्षेपाची गरज नाहीशी होते. अनलॉकच्या टप्प्यात विविध व्यवसाय, कॉर्पोरेट ऑफिसेस, बँका, मॉल, शाळा, कारखाने, रुग्णालये येथील कामकाज सुरू झाल्यावर कोव्हिडड-१९ साठी विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्यासाठी हे उपकरण उपयुक्त आहे.

इस्टॉल करण्यास अगदी सोपे असलेले हे उत्पादन झेस्टाइंडिया डॉटकॉम या अधिकृत वेबसाइटसह फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि इतर कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. तंत्रज्ञानदृष्ट्या अत्याधुनिक, बायोमॅट्रिकसारखे दिसणारे उपकरण शरीराचे तापमान प्रभावीपणे मोजण्यासाठी उपयुक्त आहे. कंपनीतील तसेच बाहेरुन येणाऱ्या भागधारकांसाठी संभाव्य वाहकांचा प्रवेश रोखून तसेच परिसरातील इतरांना संसर्गग्रस्त होण्यापासून रोखले जाते. यामुळे संसर्गाची जोखीम दूर होते. हे उत्पादन ६ महिन्यांच्या वॉरंटीसह येते, हे त्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य. तसेच ते सेकंदाच्या आत अचूक निकाल दर्शवते.

झेस्टाचे प्रवक्ते सुफियान मोतीवाला म्हणाले, “सध्याच्या परिस्थितीत, विविध संस्थांना अनेक व्हिजिटर्सना आकर्षित करून, तसेच सर्व भागधारकांची त्यांच्यावर प्रभावीपणे आणि योग्य वेळीच देखरेख ठेवणे जवळपास अशक्य ठरू शकेल. त्यामुळेच आमचे भिंतीवर लावण्यासारखे डिजिटल थर्मोमीटर वेगाने आणि अचूक तापमान मोजण्यास सहाय्य करते. पुढील दोन आठवड्यात याचे १० हजार युनिट्स विकले जातील, अशी आम्हाला आशा आहे,” असे सुफियान मोतीवाला पुढे म्हणाले.”

Exit mobile version