Site icon साप्ताहिक एकच ध्येय

औषध क्षेत्रात भारत आणि अमेरिका यांच्यात आंतर संस्था सहकार्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

 

संयुक्त संशोधन प्रकल्प, प्रशिक्षण कार्यक्रम, परिषद, कार्यशाळा इत्यादींचा या करारांतर्गत समावेश करण्यात आला असून प्रगत शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ या सर्वांसाठी हा करार खुला राहणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट शास्त्रीय संशोधनावर आधारित पाठिंबा त्यांना मिळणार आहे.

दोन्ही शैक्षणिक संस्थांनी या करारांतर्गत पारंपरिक, शैक्षणिक, अदानप्रदान करण्याचे ठरवले असून त्याची या करारांतर्गतच विशेष प्रकल्पाच्या विकासासाठी पुढाकार घेणार आहे.

ठळक वैशिष्ट्ये

शैक्षणिक सहभागाद्वारे संशोधन आणि शिक्षण विकासामध्ये सहभाग वाढवण्यासाठी हा करार करण्याचे उद्दिष्ट होते. खालील मुद्यांवर दोन्ही देशांच्या संस्थांद्वारे माहितीचे अदानप्रदान करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

1)     थ्रीडी बायोप्रिंटींग क्षेत्रात प्रोफेसर आणि विद्यार्थी यांच्या प्रशिक्षण, अभ्यास आणि संशोधन विषयक अदानप्रदान

2)    संयुक्त संशोधन प्रकल्पावर एकत्रित काम आणि

3)    शैक्षणिक प्रकाशनांच्या माहितीचे अदानप्रदान

पार्श्वभूमी

भारत आणि अमेरिका सरकारच्या परस्पर सामंजस्य लाभ, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दीर्घकालीन सहकार्य वाढविण्यासाठी करार करण्यात आला होता. यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात, त्रिवेंद्रम येथील औषधी विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था श्री चित्रा तिरुनल, भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत राष्ट्रीय इंर्पोटंट संस्था यांचा या करारांतर्गत समावेश झाला आहे.

Exit mobile version