योग दिनानिमित्त उद्या सकाळी ६:३० वाजता प्रधानमंञी यांचे मार्गदर्शन
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. घरीच योग आणि कुटुंबासह योग या यंदाच्या योग दिनाच्या संकल्पना आहेत.
योग दिन हा एकत्र जमून साजरा करण्याचा दिवस असला तरी कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी घरीच योगसाधना करुन तो साजरा करावा, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
उद्या ते जनतेला योगदिनानिमित्त संबोधित करणार असून त्यांचं हे भाषण उद्या सकाळी साडे सहा वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरुन प्रसारित होणार आहे. त्यानंतर मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेचं पथक योग प्रात्यक्षिकं सादर करणार आहे.