Site icon साप्ताहिक एकच ध्येय

ॲमेझॉन, फ्लिपकार्ट या कंपन्यांविरोधात प्लास्टिक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट, या ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात काय कारवाई केली याची माहिती देण्याचे निर्देश, एन जी टी अर्थात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं, सी पी सी बी अर्थात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत.

सी पी सी बी नं, यासंदर्भात सादर केलेल्या अहवालात या कारवाईबाबत काहीही उल्लेख नसून, कारवाई केलेली नसेल तर ती करून तसा दुसरा अहवाल येत्या १० सप्टेंबरपर्यंत सादर करावा असे निर्देशही  एन जी टी नं दिले आहेत.

यासंदर्भात ॲमेझॉननं पुरेशी कागदपत्र सादर केलेली नाहीत, तर फ्लिपकार्टनं काही प्रतिसादच दिलेला नाही, असं प्रदूषण नियंत्रण मंडळानं एनजीटी ला कळवलं होतं. यावर, नियम पालनाची जबाबदारी, ॲमेझॉन अंतर्गत, ॲमेझॉन सेलर सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडची असून, ॲमेझॉन रिटेल  इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची नाही, असंही एनजीटी नं स्पष्टं केलं आहे.

Exit mobile version