Site icon साप्ताहिक एकच ध्येय

वंदे भारत मोहिमेच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यांमधे १०५० विमान उड्डाणं करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोव्हीड काळात परदेशात अडकलेल्या भारतीयांना हवाईमार्गे मायदेशी आणण्यासाठी, वंदे भारत मोहिमेच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यांमधे, एअर इंडिया ३००, तर खाजगी विमान कंपन्या ७५० विमान उड्डाणं करणार आहे. नागरी हवाई उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांना ही माहिती दिली.

लॉक डाऊनच्या काळात १८ जून पर्यंत, हवाई आणि जलवाहतुकीद्वारे परदेशातून २ लाख ७५ हजार एवढ्या भारतीयांना मायदेशी आणलं असून उडान सेवेअंतर्गत हवाईमार्गे ९४० टनाची मालवाहतूक केली आहे, अशी माहितीही पुरी यांनी दिली.

Exit mobile version