देशाच्या अनेक भागात कंकणाकृती सूर्यग्रहणाचा देखावा अनुभवायला मिळाला
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज साध्या डोळ्यांनी पाहता येण्यासारखं खंडग्रास सुर्यग्रहण दिसलं. देशाच्या उत्तर भागातल्या नागरिकांना सूर्यग्रहणाच्या कंकणाकृती स्वरुपाचं दर्शन घेता आलं. देशाच्या इतर भागात आणि राज्यात मात्र ते खंडग्रास स्वरुपात दिसलं. हे या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण होतं.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक नागरिकांना ढगाळ वातावरणामुळे खंडग्रास सुर्यग्रहण पाहता आलं नाही. चिपळूण आणि गुहागर परिसरात काही नागरिकांनी मात्र पुरेशी काळजी घेऊन ग्रहण पाहिलं.
वाशिम जिल्ह्यात काही भागामध्ये खंडग्रास सूर्यग्रहण दिसलं.
काही हौशी खगोल प्रेमींनी हे सूर्यग्रहण दुर्बिणीच्या माध्यमातून फेसबुकवर लाईव्ह दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.