मुंबईत पश्चिम उपनगरात कोरोना नियंत्रणासाठी महानगरपालिकेची विशेष मोहीम
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या पश्चिम उपनगरात कोरोना नियंत्रणासाठी दहिसर, बोरिवली, कांदिवली आणि मालाडपर्यंतच्या भागात, महानगरपालिकेनं विशेष मोहीम सुरू केली आहे. यात, घरोघर जाऊन तपासणी करताना, ऑक्सिजनची पातळी ९५ पेक्षा कमी आढळली तर घरातल्या घरातच रुग्णाला ऑक्सिजन दिला जाईल.
त्यानंतर आवश्यक ते औषधोपचार केले जातील किंवा गरज भासली, तर कोरोना उपचार केंद्रामध्ये नेलं जाईल अशी माहिती,महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं दिली. आता या भागातल्या प्रतिबंधित क्षेत्रात पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.